“जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात”

मुंबई | जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावाने मरत असताता. तलवारीची मूठ आमच्याही हातात येईल. तेव्हा हे शस्त्र तुमच्यावरच उलटलेलं असेल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून महाविकास आघाडीचे नेते आणि नातेवाईकांना त्रास देण्याचं काम करत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठी उभा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

नीचपणाचा कळस आणि कपट काही राजकीय पक्ष करत आहेत. पण हे कारस्थान त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे तुमच्या घरचे नोकर आहेत अशा प्रकारे काम करत आहेत. आम्ही घाबरत नाही. ईडीचे अधिकारी आमच्याकडे येऊन गेले. परत या आम्ही स्वागताला तयार आहोत. तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असं राऊतांनी म्हटलंय.

2024 नंतर हे शस्त्र तुमच्यावर उलटेल. हे शस्त्रं तुमच्यावर उलटेल हे तुम्हाला सांगतो. जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात. तलवारीची मूठ आमच्याकडेही येईल. तेव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही. कितीही कपट कारस्थान करताय ते करा. पण तपास यंत्रणांनी त्यांचे मोहरे बनू नये, असंही ते म्हणालेत.

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. मात्र कंगनाच्या या विधानानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार सरकारला राहिलेला नाही. जर त्यांनी कंगणा बेनला दिलेले पुरस्कार परत घेत नाही तोपर्यंत भाजपला अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही, असंही राऊत म्हणाले.

कंगनाबेनला तरी काय लाजलज्जा. तिने माफी तरी मागावी, ज्या वृत्तवाहिनीच्या व्यासपीठावरून हा सोहळा झाला. तिथे लोकांनी टाळ्या वाजवल्या. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असं राऊच म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे जुनेजाणते नेते राहुल गांधी आणि काँग्रेसला सतत अडचणीत आणत असतात. ते विद्वान आहेत. पुस्तक लिहितात. एखादी ओळ हिंदुत्वावर लिहून वाद आणि वादळं निर्माण करतात, अस म्हणत राऊतांनी सलमान खुर्शीद यांच्यावर टीका केली.

हिंदुत्वाला किंवा हिंदुधर्माला बोकोहराम किंवा इसिसची उपमा देणं हे कंगनाबेननं जो अपमान केला तसंच आहे. काय केलं हिंदुत्वाने? काही लोकं चुकीचे वागले असतील. पण त्याची खापर हिंदुत्वार फोडणं ही मुर्खाची लक्षणे आहेत, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, ओव्हर डोस घेऊन जास्त बोलतीये” 

“कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या, लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी” 

‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखांचे बनले 1 कोटी

 “राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते”

“भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, आम्ही जाब विचारणार”