संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | खासदार संजय राऊत यांनी आज दहिसरमधील सभेत बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना संजय राऊतांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मी प्रताप सरनाईकांना फोन केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टात केस आहे म्हणून आलो आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मला फोन करुन सांगितलं की, देवेंद्र फडवणीस मला भेटले इथं. ते मला अमित शाहांकडे घेऊन गेले आणि माझं ईडीचं मॅटर क्लियर साफ झालं. त्यामुळं मी आता सूरतला जात आहे, असं सरनाईकांनी सांगितल्याचा धक्कादायक खुलासा राऊतांनी केला आहे.

अशी कोणती वॉशिंग मशीन होती की इतकी मोठी हजारो कोटींची भ्रष्टाचाराची केस अशी टाकली आणि स्वच्छ झाली, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

ज्या दिवशी माझ्या घरावर रेड पडल्या त्यावेळी मी दिल्लीत होतं. मी रात्री 12 वाजता फोन करुन अमित शाहांना सांगितलं की, माझ्यासाठी माझ्या आसपासच्या लोकांना त्रास देऊ नका. हिंमत असेल तर मला अटक करा. अजूनही मला अटक करण्याचे प्रयत्न आहेत, असंही ते म्हणाले.

काय वॉशिंग मशीन आहे. हा कोणता ब्रँड आहे. ईडीची कारवाई माझ्यावरही झाले. माझं घर जप्त केलं. माझी वडिलोपार्जित जमीन जप्त केली. मी तरीही गुडघे टेकले नाहीत, असं राऊतांनी सांगितलं.

शिवसेना अखंड आहे, फिनिक्स पक्षाप्रमाणं पुन्हा पुन्हा झेप घेईल, असंही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

आणखी एक मंत्री नॉट रिचेबल; शिवसेनेचं टेंशन वाढलं 

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा 

सर्वात मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर 

‘…पण त्यांनी आता शिवसेनेच्या आईवरच हात घातला’, किशोरी पेडणेकरांचा घणाघात 

“कुठलाही गद्दार बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही, मतं मागायचीच असतील तर…”