“मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे कमावलं ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावलं”

मुंबई | मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे कमावलं ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावलं, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

पवारांच्या नातेवाईंकावर आयटीच्या धाडी, एसटी संप चिघळवण्यासाठी भाजपनं प्रयत्न, अमरावतीमध्ये जातीय दंगे भडकवणं हे सर्व करुन ही भाजप ठाकरे सरकारला चरोटाही पाडू शकलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले. विरोधी भाजपनं ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी आणि कोंडी करण्यासाठी प्रयत्न केले. राजकारणातील कमरेखालचे वार करुनही सरकार कायम आहे, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरका आता लवकरचं पडेल असं म्हटलंय. भाजप तारखा देण्याच्या फंदातून आणि छंदातून बाहेर पडलेला नाही. चंद्रकांत पाटील नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकारिणीत सरकार पडेल आणि आपण सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षानं बाहेर पडावं, असं म्हणणारे पुन्हा ठाकरे सरकार पडेल असं सांगतात. त्यांनी आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी, असा सल्ला संजय राऊत यांनी भाजपला दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ आहे, ते लोकांमध्ये प्रिय आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांचा चेहरा आश्वासक होता.हाच माणूस संकटातून रक्षण करेल, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला होता, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळं राज्यावरील कोरोनाचे संकट थोडे मागे हटले असल्याचं संजय राऊत म्हणाले.

नोटाबंदी, कोरोना व्यवस्थापनातील अनांगोदी, तीन कृषी कायद्यांवर घ्यावी लागेलली माघार यावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय.

कोरोनाच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या पीएम केअर फंडातील व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, यावर भाजपचे ऑडिटर जनरल किरीट सोमय्या बोलायला तयार नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

सेक्स व्हिडीओ प्रकरण, भय्यू महाराज प्रकरणात धक्कादायक खुलासा 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत ICMR चं मोठं वक्तव्य! 

 “उद्धव ठाकरे गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले”

‘या’ पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दीड वर्षात 1 लाखाचे झाले ‘इतके’ कोटी 

छगन भुजबळांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली, म्हणाले…