मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलाय. एक वेगळं जातीय वातावरण देशात निर्माण केलं जात आहे, असं म्हणत शरद पवारांनी केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
हिंदू-मुस्लिम दंगल, दलितांमध्ये काही करता येईल का यासाठी सतत काहीतरी सुरु आहे, असा गंभीर आरोप शरद पवारांनी केंद्र सरकारवर केला आहे.
काश्मीरमध्ये हिंदू समाज एकेकाळी राहत होता. एक काळ आला तेव्हा दहशतवाद्यांनी हिंदूंवर हल्ला केला आणि त्यांना काश्मीर सोडून यावं लागलं. यावर एका गृहस्थांनी सिनेमा काढला आणि हिंदूंवर अत्याचार कसा केला असं दाखवलं, असं शरद पवार म्हणालेत.
ज्यावेळी एखादा लहान समाज संकटात जातो आणि तिथला मोठा समाज असणारा मुस्लिम त्यांच्यावर हल्ला करत होता हे दिसतं तेव्हा देशातील बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्था निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला, असंही पवार म्हणालेत.
वेळी काँग्रेस सत्तेत नव्हतं, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मही झाला नव्हता. त्या हल्ल्याची जबाबदारी भाजपला टाळता येत नाही. हे देशाच्या इतिहासाला सुरुंग लावण्याचं काम आहे, असंही पवारांनी म्हटलं.
दरम्यान, सार्वजनिक जीवनात संकटं येतात. काही आयोजित केलेली असतात तर काही परिस्थितीने आणलेली असतात. पण त्यांना तोंड देण्याची भूमिका घ्यायची असते, असं पवारांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
“कायद्यापासून पळू नका सांगणारे आता *** पाय लावून पळतायेत”
Raj Thackeray | “जरा मोकळं बोलले तर इतकी हवा, मनमोकळं बोलले तर मग एकदम धुव्वा”
राज ठाकरेंच्या सभेला काही तास शिल्लक असताना संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट, म्हणाले…
शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मिटकरींचा खळबळजनक आरोप, म्हणाले…
“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात”