Top news महाराष्ट्र मुंबई

“गृहखात्यानं कठोर पावलं उचलावी अन्यथा…”

sharad pawara nd uddhav

मुंबई | ज्याच्या गृहखात्याला आता कठोर पावलं उचलावी लागतील, नाहीतर तुम्ही तुमच्यासाठी रोज एक नवीन खड्डा खोदत आहात, असं वक्तव्य शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.

महाराष्ट्राच्या पोलिसांना जर काही सुचना मिळाल्या, काही मार्गदर्शन मिळाले तर काम होऊ शकेल. त्यासाठी गृहखात्यानं अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये किंवा नॉर्थ इस्टमध्ये अचानक अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात त्याचप्रकारे या कारवाया सुरु असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

यातून संघर्ष झाला तर केंद्र आणि राज्य यांच्यात मोठा संघर्ष होऊ शकतो. म्हणूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपशासीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. ते पत्र याच भूमिकेतून लिहले आहे की, ज्याप्रकारे ईडी, सीबीआयचा देशात गैरप्रकार चालू आहे, त्याविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं असं राऊत यावेळी म्हणाले.

पाकिट मारणाऱ्यांचा तपास करणंच ईडीकडून बाकी असल्याचा टोलाही संजय राऊत यांनी तपास यंत्रणा आणि भाजपला लगावला आहे.

पाच राज्याच्या निवडणुकीत सरकारने जनतेला एप्रिल फुल केलं आहे. अच्छे दिन हे एप्रिल फुलच आहे. खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील म्हणून लोक गेल्या 7 वर्षापासून वाट बघतायेत, पण हे एप्रिल फुल असल्याचं म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

एप्रिल फुल हा गंमतीचा विषय राहिला नसून, हा जनतेच्या जगण्या मरण्याचा प्रश्न झाला आहे. यातून मार्ग काढावा लागेल. सरकारने जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे, थापा मारणं, फसवा फसवी बंद केली पाहिजे. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न गंभीर होत चालले असल्याचे राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

फक्त परीक्षेसाठी अभ्यास करू नका, स्वत:चा विकासही त्यातून करा- नरेंद्र मोदी 

“अच्छे दिन हे एप्रिल फुलच, गेल्या 7 वर्षापासून लोक 15 लाख रुपयांची वाट बघतायेत” 

“रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी” 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या दाव्याने खळबळ, म्हणाले… 

ग्राहकांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला