मुंबई | सक्तवसुली संचलनालयाने (ED) पैशांची अफरातफर आणि गोरेगाव पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक केली आहे.
राऊतांना सध्या ईडीच्या कोठडीत ठेवले गेले आहे. आता त्यांच्या प्रकरणातील चौकशीत मोठी धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. संजय राऊत बिल्डरच्या दोन आलिशान गाड्यांचा वापर करत होते.
श्रद्धा डेव्हलपर्स (Shradha Developers) संचालकाच्या मालकीच्या दोन लक्झरी गाड्या आहेत. संजय राऊत त्यांचा वापर करत असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या गाड्यांचा वापर संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय करत होते.
संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत. बुधवारी ईडीने मुंबईसह अनेक ठिकाणी छापेमारी केली. यावेळी ही माहिती समोर आली.
मुंबई उपनगारातील मुलुंड (Mulund) येथील श्रद्धा डेव्हलपर्सच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला. यावेळी कार्यालयातील कागदपत्रे आणि संगणकांची छाननी करण्यात आली. तेव्हा ही माहिती समोर आली.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने बुधवारी अवनी इन्फ्रास्ट्रक्चरवर (Awani Infrastructure) देखील छापा टाकला. सदर कंपनी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत आणि कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत (Pravin Raut) यांच्या पत्नी माधुरी राऊत (Madhuri Raut) यांनी स्थापन केली होती.
महत्वाच्या बातम्या –
“राष्ट्रवादीतील या पाच बड्या नेत्यांची चौकशी करायची आहे”
मेहबुबा मुफ्तींचे मोंदीवर गंभीर आरोप; म्हणाल्या, आमच्या राज्याला…
मोठी बातमी! श्रीवर्धन समुद्र किनारी संशयास्पद बोट आढळल्याने खळबळ
बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप येणार? प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
“…म्हणून नितीन गडकरींचं महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न”