योगी आदित्यनाथांच्या वाढदिवसाला संजय राऊतांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना अनेकजण शुभेच्छा देत आहेत, मात्र या साऱ्यांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शुभेच्छा लक्षवेधी ठरल्या आहेत.

योगींच्या कार्यकाळात राम मंदिराचं निर्माण होवो, अशा अनोख्या पद्धतीने संजय राऊत यांनी आदित्यनाथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?-

“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी नेहमीच त्यांचा आदर करत आलो आहे. अयोध्येच्या लढाईत योगीजींनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकाळात राम मंदिराचं निर्माण होवो” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही योगींना शुभेच्छा दिल्या आहेत-

 

महत्वाच्या बातम्या-

-अशाप्रकारे ‘या’ शिक्षिकेनं 13 महिन्यात कमावले 1 कोटी रुपये वेतन

-अडचणीच्या काळात काँग्रेसला आणखी एक धक्का; ‘या’ आमदारानं सोडली साथ

-गर्भवती हत्तीण मृत्यू प्रकरणात प्रशासनाच्या जोरदार हालचाली; केली ‘ही’ धडक कारवाई!

-वाढदिवस स्पेशल | नरेंद्र मोदींसोबत पंगा घेणारा माणूस; काय घडला होता नेमका प्रकार?

-RTI अंतर्गत PM केअर फंडाबाबत विचारले होते प्रश्न; PM कार्यालयाने उत्तरं दिली नाहीत!