मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोमय्यांनी हे आरोप फेटाळून देखील लावले होते. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज देखील केला होता. त्यानंतर आता न्यायालयाने किरीट सोमय्यांना मोठा धक्का दिला आहे.
न्यायालयाने सोमय्या पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
अशातच संजय राऊतांनी आरोपाची मालिका कायम ठेवल्याचं पहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी सोमय्यांवर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. अशातच राऊतांनी पुन्हा ट्विट करत सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
बाप बेटे जेल जायेंगे…अनिल देशमुख नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे, असं संजय राऊत ट्विट करत म्हणाले आहेत. त्याचबरोबर राऊतांनी एक शायरीवाला फोटो देखील शेअर केला आहे.
दरम्यान, आग लगाने वालो कों कहा खबर, रूख हवाने बदला तो खाक वो भी होंगे, अशी शायरी राऊतांनी शेअर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! किरीट सोमय्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली
“राजभवनाचे बँक खाते नव्हते म्हणून…”; सोमय्यांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा
“अजून वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत यावं”
“लोक बेकार असतात, माझ्या सारखे सेक्सी कपडे घालतात त्यांना…”