“फडणवीस गोव्यात गेले अन् भाजपमध्ये फुट पाडून आले”

मुंबई | देशातील राजकारणात सध्या फक्त पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची चर्चा होताना दिसत आहे. सर्व पक्ष आपापले दावे आणि डावपेच आखत आहेत.

गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब या पाच राज्यातील 690 विधानसभा जागांसाठी आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पाचपैकी चार राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. तर पंजाब या एकमेव राज्यात काॅंग्रेसची सत्ता आहे. परिणामी सर्व विरोधकांनी भाजपच्या सत्तेला हादरा देण्याची तयारी चालू केली आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपविरोधकांना यश मिळालं होतं. अशाच प्रकारच्या प्रयोगाची सध्या देशपातळीवर चर्चा चालू आहे.

अशात भाजप नेते राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर गोवा भाजप प्रभारी पदाची जबाबदारी भाजप पक्षश्रेष्ठींनी सोपवली आहे.

फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. फडणवीस गेले अन् गोव्यात भाजपमध्ये फुट पाडून आले, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

गोव्यात सध्या भाजपला गळती लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अशावेळी फडणवीस प्रभारी असल्यानं त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी शिवसेनेच्या गोव्यात निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर मिश्किल टीका केली होती. आता राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

महाराष्ट्रातून नोटांनी भरलेल्या बॅगा गोव्यात जात आहेत. आमची लढाई याच नोटांविरोधात आहे. असं फडणवीसांना उद्देशून राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, गोव्यात आणि उत्तर प्रदेशात शिवसेना निवडणूक लढवणार आहे. गोव्यात सध्या शिवसेना महाविकास आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “मुंबई महापालिकेत 100 कोटींचा पार्किंग घोटाळा”; काॅंग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ

 राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 3-4 दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरणार

  ‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही”