‘सामना’च्या अग्रलेखाची धार वाढली, पाहा नेमकं काय म्हटलंय…

मुंबई | बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेनं ‘सामना’च्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्रावर वार’ या मथळ्याखाली हा अग्रलेख लिहिण्यात आलाय. शिवसेनेनं अग्रलेखातून भाजपवर देखील सडकून टीका केली आही.

महाराष्ट्रातील सरकारला खाली खेचण्याची एकही संधी भाजपवाले सोडत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचं प्रकरण पहाटे झालं. त्यात यश आलं नाही. आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून ‘ऑपरेशन कमळ’ घडवीत आहेत. काही करून राज्यातील सरकार घालवायचं याच ईर्षेने त्यांना झपाटलेलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

शिवसेनेने ‘आई-बाप’ बनून असंख्य फाटक्या लोकांना जे दिले ते इतर पक्षांत भल्याभल्या वतनदारांना मिळवता आले नाही. शिवसेनेसाठी छातीचा कोट करून जो मावळा उभा राहिला त्याच्या त्यागातून भगवा झेंडा डौलाने फडकत राहिला. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी माती खाल्ली त्यांना महाराष्ट्राची माती व शिवसैनिक माफ करणार नाहीत, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

संकटांशी आणि वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच, असा इशारा शिवसेनेनं लेखात दिला आहे.

धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करेल काय? असा सवाल देखील करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील सरकारचे काय होणार हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? असा देखील सवाल लेखात केला गेला आहे.

दरम्यान, भाजपने टाकलेल्या या जाळ्यात शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे सहज फसले. ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि कारवाईला घाबरून शिंदे यांच्यासोबत गद्दार आमदार सुरतला पळाले, असंही अग्रलेखात म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा दावा; शिवसेनेचं टेंशन आणखी वाढलं 

‘एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा’; बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल 

‘अडीच वर्ष सत्तेचा मलिदा चाखणारेच आता…’, संजय राऊतांची खोचक टीका 

’24 तासांत मी तुमच्यासाठी वाईट झालो का?’, एकनाथ शिंदेंचा सवाल

“21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?”, मनसेचा टोला