कारवाईच्या आदेशानंतर संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंनाच चॅलेंज, म्हणाले…

मुंबई | आमदार संतोष बांगर पक्षाशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी संतोष बांगर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यानतंर पक्षाकडून कारवाई करत संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे.

संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार तसंच जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं बांगर यांना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आमदार संतोष बांगर आक्रमक झाले होते. बंडखोर आमदारांविरोधात त्यांनी आंदोलनही केलं. मात्र नंतर ते शिंदे गटात सामीस झाले होते.

मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहेत म्हणत संतोष बांगर ढसाढसा रडले होते, पण यानंतर अवघ्या 24 तासाच बांगर शिंदे गटात सहभागी झाले होते.

दरम्यान, संतोष बांगर यांनी थेट आदेशालाच चॅलेंज दिलं आहे. मी अजूनही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे, असं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याने एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक असल्याचंही बांगर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांना दिलासा, शिवसेनेत नाराजीचा सूर

लाज वाटत नाही का? उर्फी जावेदची साडी पाहून नेटकरी संतापले, पाहा व्हिडीओ

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयाचा देशमुखांना आणखी एक दणका

‘आपल्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले’, उद्धव ठाकरेंचं शिवसेना आमदारांना भावनिक पत्र

आबाबा! रणवीर-दीपिकाने खरेदी केलं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल