सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांना दिलासा, शिवसेनेत नाराजीचा सूर

मुंबई | बंडखोरी करत शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांविरोधात सेनेने अपात्रतेच्या कारवाईचा बडगा उचलला होता. मात्र, शिवसेनेच्या या निर्णयाला शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

त्यावेळी सुनावणीची तारीख 11 जुलै देत सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

सर्वांचं लक्ष आजच्या सुनावणीकडे लागलं असताना हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवावं लागणार असून त्यासाठी अवधी लागणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधिशांकडे दाखल असलेल्या याचिकांवर सुनावणीसाठी विनंती केली असता सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

यासोबतच विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला असला तरी शिवसेनेतून मात्र नाराजीचा सूर येत आहे.

शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. बेकायदेशीरपणे निर्माण झालेल्या सरकारला संरक्षण दिलं जात आहे आणि वेळकाढूपणा केला जात आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.

आम्ही सुप्रीम कोर्टाकडं एकमेव आशा म्हणून पाहात आहोत. मात्र, न्याय द्यायला उशीर करणं हे सर्वोच्च न्यायालयाला शोभत नाही, असं म्हणत अरविंद सावंत यांनी नाराजी दर्शवली आहे.

दरम्यान, कायद्याची पायमल्ली होत असताना सुप्रीम कोर्ट आणि सगळेच शांत आहेत. अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये असं सांगत सुप्रीम कोर्टाने नक्की कोणाला दिलासा दिला आहे?, असा सवाल देखील अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लाज वाटत नाही का? उर्फी जावेदची साडी पाहून नेटकरी संतापले, पाहा व्हिडीओ

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयाचा देशमुखांना आणखी एक दणका

‘आपल्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले’, उद्धव ठाकरेंचं शिवसेना आमदारांना भावनिक पत्र

आबाबा! रणवीर-दीपिकाने खरेदी केलं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

काळजी घ्या! मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ भागात रेड अलर्ट जारी