युवक काँग्रेस सज्ज; विधानसभेसाठी पक्षाकडे मागितल्या ‘एवढ्या’ जागा!

मुंबई | विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळेच पक्ष आपआपल्यापरीने तयारीला लागलेत. अशात युवक काँग्रेसनेही पक्षश्रेष्ठींकडे युवकांना संधी दिली जावी अशी मागणी केली आहे. याबाबत पक्षश्रेष्ठीही सकारात्मक आहेत, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ‘ABP माझा’शी बोलताना दिली आहे. 

युवक काँग्रेसने 60 जागांची मागणी केली आहे. त्या पात्रतेचे सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत. निवडून येण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांना संधी दिल्यास येत्या निवडणुकीत काँग्रेसला नक्कीच फायदा होईल, असंही सत्यजीत यावेळी म्हणाले.

महानगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य, जि. प. अध्यक्ष असे स्थानिक स्वराज्य संस्थेत सक्रिय असणारे युवक आणि युवती पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरतील आणि निवडूनही येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त व्यक्त केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादी-काँग्रेस जरी एकमेकांविरोधात लढत असले तरी या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी वाटाघाटी कराव्या लागतील. आम्हाला एक पाऊल मागे-पुढं व्हावं लागेल, असंही सत्यजीत म्हणाले.

दरम्यान, येत्या निवडणुकीसाठी युवक काँग्रेस सज्ज आहे. पक्षाने आदेश द्यावा. आम्ही सर्व ताकदीने मैदानात उतरू आणि जिंकू सुद्धा!, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-