मुंबईच्या रस्त्यांवर मी आजपर्यंत एकही खड्डा पाहिला नाही; पाहा कोणत्या नेत्यानं केला दावा!

मुंबई |  मुंबईच्या खड्ड्यांमुळे मुंबईकर हैराण झालेले असतानाच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने शहरामध्ये एकही खड्डा नसल्याचं अजब वक्तव्य केलं आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांनी हा अजब दावा केला आहे.

मी मुंबईच्या रस्त्यांवरुन रोज प्रवास करतो. मी मुंबईच्या रस्त्यांवर आजपर्यंत एकही खड्डा पाहिलेला नाही, असं यशवंत जाधव यांनी सांगितलं आहे. मुंबईतील रस्त्यांवर खड्डे नसल्याचं सांगतानाच काही खड्डे असले तर ते केवळ मेट्रोच्या कामांमुळे असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा नाही. तुम्ही मला एखादा तरी खड्डा दाखवाच. माझ्यासारख्या रोज प्रवास करणाऱ्याला एकही खड्डा दिसलेला नाही, असं जाधव म्हणाले आहेत.

जर मुंबईच्या रस्त्यावर काही खड्डे असतील तर ते मेट्रोचे बांधकाम सुरु असल्याने झाले आहेत. पण मी खात्रीने सांगू शकतो की मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे नाहीत, असं जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईकरांना खड्यांच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. या वर्षी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांनी सात जणांचा बळी घेतला आहे. 

महत्वाच्या बातम्या-