सत्यजित तांबेंनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काकूंची तुलना केली थेट अर्थमंत्र्यांशी!

मुंबई | सोशल माध्यमांमुळे एका रात्रीत कोणालाही माहित नसलेल्या व्यक्ती राज्यभर काय देशभर प्रसिद्ध होतात,अशी अनेक उदाहरण आहेत. आत्ता मागे बारामतीमधील सुरज चव्हाण असो वा मागे लता मंगेशकर याचं गाणं गाणारी रानू मंडल, असे अनेकजण आहेत. मात्र सध्या सोशल माध्यमांवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे आणि त्याच व्हिडीओवरून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी थेट देशाच्या अर्थमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. एक घरकाम करणाऱ्या काकूंना त्यांचे 1800 रूपये देण्यात आले. हे पैसे देताना संबंधित मुलांनी 500 च्या तीन आणि 200 ची एक तर 100 ची एक नोट असे 1800 रूपये दिले. मात्र त्या काकू बोलत आहेत की तु मला दीड हजार आणि तीनशे रूपये दिले आहेत आणि माझे मला अठराशे रूपये नाही दिले.

ती मुलं त्या काकूंना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की काकू दीड हजार आणि तीनशे रूपये म्हणजे अठराशे रूपयेच होतात. मात्र त्या काकू काही मानायला तयार नाहीत. मुलं त्यांना कॅलक्यूलेटरवर सांगण्याचा प्रयत्न करतात मात्र त्या काही ऐकताच नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की तू मला दीड हजार तीनशे रूपये दिले असून 1800 रूपये नाही दिले.

तुम्ही मला आणखीन 500 रूपये द्या किंवा 100 रूपये कमी देऊन 400 रूपये दे. हा सावळा गोंधळ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र  सत्यजित तांबे यांनी याचाच धागा पकडत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना टोला लगावला आहे.

निर्मला काकू, अर्थतज्ञांशी जीडीपी ठरवण्याच्या पध्दतीबाबत चर्चा करतांना, असं कॅप्शन देत सत्यजित तांबे यांनी हा व्हिडीओ फेसबूकवर पोस्ट केला असून त्यांनी ट्विटही केला आहे.

एकंदरित सत्यजित तांबेना असं म्हणायचंय की निर्मला सीतारामन यांना जीडीपीमधील कीहीही ज्ञान नाही. सध्या हा व्हिडीओ राज्यभरतर व्हायरल झाला आहे मात्र आता सत्यजित तांबे यांनी त्याला देशभर व्हायरल होण्यासाठी खतपाणी घातलं आहे.

दरम्यान, सत्यजित तांबेंनी केलेल्या टीकेवर भाजपतर्फे काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीच्या आणखी एका युवा तडफदार आमदाराला कोरोनाची लागण

“महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेबरोबर सत्तेत आहे याची खदखद काही कॉंग्रेसजणांच्या मनात आहे”

‘…त्यावेळी महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले’; तुकाराम मुंढेंनी केला खळबळजनक खुलासा

धक्कादायक! “सुशांतचा पाय मोडलेल्या अवस्थेत होता आणि त्याच्या गळ्यासह ‘या’ भागावर सुयांनी टोचलेलं होतं”

‘सत्तेचं दार बंद झाल्यानं भाजपचा घंटानाद…’; रुपाली चाकणकरांचा भाजपला टोला