मुंबई | समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वानखेडे यांच्या कुटुंबियांनी राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिलं आहे.
राज्यपालांनी सर्व काही ठीक होईल, असं आश्वासन दिल्याचं ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितलं. आम्ही खऱ्याची लढाई लढत आहोत. आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं आहे, असं क्रांती रेडकर यांनी म्हटलंय.
आम्हाला राज्यपालांचा पाठिंबा हवा आहे. त्याबाबत राज्यपालांनी आश्वासन दिलं आहे. मी असाच लढत राहणार. राज्यपालांकडून आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे. ती स्फुर्ती घेऊन आम्ही अधिक ताकदीने लढणार आहोत. जी सत्य परिस्थिती आहे ती राज्यपालांकडे मांडली, असंही क्रांती रेडकर म्हणाल्या.
आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं जात आहे. इज्जत आणि अब्रूवर टीका केली जात आहे. टॉन्ट मारले जात आहेत. ही सर्व सत्य परिस्थिती राज्यपालांकडे मांडली आहे, असं त्यांनी सांगितलं.
राज्यपालांनी सांगितलं की सत्याचा विजय नक्की होईल. राज्यपालांची भेट सकारात्मक झाली आहे. काही सविस्तर माहिती आम्ही देऊ शकत नाही, असं क्रांती रेडकरने सांगितलं.
अभिनेत्री क्रांती रेडकर यांची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर या ड्रग्जच्या व्यवसायात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
नुकतंच समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. त्यानंतरही नवाब मलिक यांच्याकडून आरोपांची सरबत्ती सुरुच आहे.
समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा, असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे म्हणून सादर केले आहेत.
दरम्यान, ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘संगम’ या दोन इंटरव्हलचे पिक्चर नाहीत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही, असं ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
“प्रभू श्रीराम हे दशरथाचे पुत्र नाहीत, ते तर…”
“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”
कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूचं सावट! युरोपातील अनेक देशात चिंतेचं वातावरण
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं! राज्यभरातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
रोहित शर्मा भारताचा नवा कर्णधार; आयपीएलमध्ये झळकलेल्या ‘या’ चार युवा खेळाडूंची संघात वर्णी