“अर्जुनला इतकी मेहनत करताना पाहून वाटतं की सैफला सोडून त्याच्याशी लग्न करावं”

मुंबई | अभिनेत्री करीना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. करीना नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यामुळे ओळखली जाते. व्यावसायिक आयुष्य असो किंवा वैयक्तिक कोणत्या परिस्थितीत काय उत्तर द्यायचं, हे करीनाला चांगलंच माहित आहे.

आपल्या या वृत्तीमुळे तिने अनेकदा प्रश्न विचारणाऱ्याची बोलती बंद केली आहे. असाच काहिसा किस्सा ‘की अॅंड का’ चित्रपटावेळी घडला होता. पत्रकाराच्या एका प्रश्नाला करीनाने असं काही उत्तर दिलं होतं की पत्रकाराची बोलती बंद झाली होती.

की अॅंड का चित्रपटामध्ये करीना आणि अर्जुन कपूर या दोघांनी मुख्य भुमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये एका पत्रकाराने करीनाला सैफशी संबंधित प्रश्न विचारला होता. पत्रकाराने करीनाचा पती सैफ अली खानची तुलना ऑनस्क्रिन पती अर्जुन कपूरशी केली होती.

यावेळी पत्रकाराला उत्तर देताना करीना हसत म्हणाली होती की, अर्जुनला इतकी मेहनत करताना पाहून मला असं वाटतं की सैफशी सोडून अर्जुनशी लग्न करावं. यावेळी करीनाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.

पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर करीनाने पत्रकाराला चांगलंच झापलं होतं. ती म्हणाली होती की, हा प्रश्न पुर्णपणे चुकीचा आहे. अर्जुन आणि सैफ यांच्यात कोणत्याच प्रकारे तुलना होऊ शकत नाही.

दरम्यान, की अॅंड का चित्रपटावेळी अशीही बातमी समोर आली होती की, शुटींग चालू असताना अर्जुन करीनाला रात्री फोन करायचा. मात्र, सैफला हे अजिबात आवडत नव्हतं. एकदा सैफने त्याला यामुळे झापलं देखील होतं. यासंबंधित सैफने स्वत: माहिती दिली होती.

याविषयी बोलताना सैफने एका मुलाखतीत सांगितले होता की, मी त्यावेळी अर्जुनचा फोन उचलून त्याला समजावले होते की, करीना तुझी सिनीअर आहे तिचा आदर केला पाहिजे. रात्री कॉल करण्याचे कारण कामाशी संबंधित असू शकते हे मला समजते पण सकाळ होईपर्यंत थांबू शकतो ना?

महत्वाच्या बातम्या-

“सोशल मीडियावर नुसत्या फुलाचा फोटो शेअर केला तरी त्याला हस्तमैथुन…”

‘या’ बड्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल, महिला रायटरची केली फसवणूक?

अभिषेकच्या ‘या’ गोष्टीवर आहे ऐश्वर्याचं प्रेम, म्हणूनच केलं बीग बींच्या मुलाशी लग्न

…म्हणून कियारा ‘शेरशाह’ चित्रपटात डिंपलची भूमिका साकारल्यानंतर रडली होती; वाचा सविस्तर

इंदिरा गांधींची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचे वडील होते इंदिरा गांधींचे खासगी पायलट