डाॅक्टरला ऑक्सिजनसाठी रडताना पाहून ‘या’ अभिनेत्रीनं उपलब्ध करुन दिले सिंलेंडर, म्हणाली…

मुंबई| देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. या लढाईत अनेक योद्ध्यांना कोरोनानं ग्रासलं देखील. तसेच अनेक डॉक्टर्स, नर्सेस यांनी या लढाईत आपले प्राण देखील गमावले आहेत.

दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे.

दुसरीकडे देशातील राजकारण देखील दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. औषधे, आॅक्सिजन यांचा पुरवठा अपुरा पडत आहे. जवळपास सगळ्याच राज्यांची हालत खराब आहे. अशातच आरोग्य सुविधांचा तुटवडा यामुळे देशात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिने मोठी मदत केली आहे.

दिल्लीतील एका हाॅस्पिटलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात हाॅस्पिटलचे सीईओ आॅक्सिजनच्या तुटवड्यामुळे रडताना दिसत होते. तो व्हिडीओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन भावूक झाली आहे. तिने या परिस्थितीत दिल्लीतील डॉक्टरांना मदतीचा हात दिला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने काही आॅक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करुन दिले आहेत. दिल्लीमधल्या आॅक्सिजनच्या समस्येबद्दल सुश्मिताला ट्विटरच्या माध्यमातून कळलं. त्यासाठी तिने काही आॅक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करुनही दिले आहेत. मात्र ते मुंबईहून दिल्लीला नेण्यासाठी तिच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तिने आपल्या चाहत्यांना ही सोय उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले आहे.

सुश्मिता आपल्या ट्विटमध्ये लिहिते, “सगळीकडे भेडसावत असलेल्या आॅक्सिजन समस्येबद्दल ऐकून फार वाईट वाटतं. मी या हाॅस्पिटलसाठी काही आॅक्सिजन सिलेंडरची सोय केली आहे. पण मुंबई हून दिल्लीला पाठवण्यासाठी माझ्याकडे मार्ग नाही. यासाठी कृपया मला मदत करा.” यावर चाहत्यांकडून सुश्मिताला विविध पर्याय सुचवण्यात आले. तसंच तिचे भरभरुन कौतुकही केले.

दुसरे ट्विट करत सुश्मिताने लिहिले की, “मी सांगत असलेल्या हॉस्पिटलमध्ये सध्यातरी ऑक्सिजनचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे सिलेंडर पोहचवण्यासाठी आपल्याला अधिक वेळ मिळाला आहे. मात्र तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.”

दरम्यान, राज्यात कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या – 

कोरोना काळात ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष,…

जाणून घ्या! कोरोना वॅक्सिन घेणे का गरजेचं आहे?

विहिरीमध्ये तो सापासोबत पोहत होता अन्…, हलक्या…

साखरपुडा झाल्यानंतर ‘हे’ कारण सांगून नवरदेवाचा…

IPl 2021: शतकाच्या जवळ असताना पडिक्कल म्हणाला, ‘मॅच…