‘तीन मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा’, कंगना रणौतचा हल्लाबोल

मुंबई| अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. ती नेहमी कोणत्या न कोणत्या काराणावरुन कोणाशी न कोणाशी पंगा घेताना दिसते. कंगना नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य, बेधडक बोलणं, यामुळे चर्चेचा विषय बनत असते. यातच कंगना आता एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. अशातच भारतातील वाढती लोकसंख्यावर कंगना रणौतने भाष्य करत एक वादग्रस्त वक्त केलं आहे.

अभिनेत्री कंगना रणौतनं पुन्हा एकदा अशी काही ट्वीट्स केली आहे. ज्यामुळे सोशल मीडिया पुन्हा एकदा नवा वाद होताना दिसत आहे.

नुकत्याच केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये कंगनानं भारतातील वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करत हे रोखण्यासाठी कठोर कायदे तयार करण्याची गरज असल्याचं म्हणत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत काही वादग्रस्त मुद्दे मांडले आहेत.

कंगना रणौतनं आपल्या एका ट्वीटमध्ये लिहिलं, ‘भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा लोकांना जबरदस्तीनं नसबंदी करायला लावली होती त्यावेळी त्या निवडणूक हारल्या होत्या आणि त्यानंतर त्यांची हत्यासुद्धा करण्यात आली होती. पण आता आजच्या काळात भारतातील वाढती लोकसंख्या हे एक संकट आहे. त्यामुळे यासाठी काही कठोर कायदे तयार करण्याची गरज आहे. ज्या अंतर्गत एखाद्या दापत्यानं जर तिसऱ्या मुलाला जन्म दिला तर त्याला दंड किंवा काही वर्षांचा तुरुंगवास अशाप्रकारची शिक्षा दिली गेली पाहिजे.’

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये कंगनानं लिहिलं, ‘देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे लोक मरत आहेत. कागदावर फक्त 130 कोटी भारतीय असते तरी याशिवाय जवळपास 25 कोटीपेक्षा जास्त भारतीय हे अवैध प्रवासी मजूर आहेत जे बाहेरच्या देशातून येऊन भारतात वास्तव्य करत आहेत.’

कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर बरंच चर्चेत आलं आहे. कंगणाच्या या ट्विटवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक कंगणाच्या म्हणण्याला पाठिंबा देत आहेत तर काहींनी कंगना रणौतला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, कंगनाच्या कामाविषयी बोलायं झालं तर कंगना लवकरच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

थलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेत्या असा 30 वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये जयललिता यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांनी मिळवलेलं यश चित्रीत करण्यात आलं आहे. हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधून जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या – 

‘मुंबईची हालत खूप खराब झाली आहे अन्….’;…

चाहता फोटो काढायला आला अन् अभिनेत्रीला किस करुन गेला!…

अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन

IPL 2021: अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर 6 विकेट्सने…

‘या’ कारणामुळे बाबिलनं वडिल इरफान खानच्या आठवणी…