ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोना झपाट्यानं वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता रुग्णांच्या संख्येत वाढ पहायला मिळत आहे. यातच ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं समजतं. डॉ. प्रकाश आमटे हे समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचं काम डॉ. प्रकाश आमटे पाहतात.

“गेल्या सात दिवसांपासून त्यांना ताप आणि खोकला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र ताप आणि खोकला कमी होत नसल्याने त्यांनी आज पुन्हा कोरोना चाचणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह आले आहे,” अशी माहिती डॉ. प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आनंदवन, लोकबिरादारी प्रकल्प आणि सोमनाथ प्रकल्प पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, “कोरोना कधी संपेल माहीत नाही. मास्क हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल डिस्टन्सिंंग हा शब्द चुकीचा आहे. आपण फिजिकल डिस्टन्सिंंग पाळले पाहिजे. दुर्दैवाने आपण ते अजिबात पाळत नाही”, अशी खंत देखील डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली होती.

राज्याच्या अनेक भागांत करोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मुंबई आणि उपनगरांतही तीच स्थिती आहे. अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 21 हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोनाची रुग्णसंख्या आणि कोरोना पॉझिटीव्ह रेटमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ 6 टक्‍क्‍यांची आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत आणि जम्बो कोव्हिड सेंटर्सला बेडची सोय तयार ठेवण्यासंदर्भातील सूचना करण्यात आल्या असल्याचे काकाणींनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय – देवेंद्र फडणवीस

‘शिव्या खायला तयार राहावं लागणार’, ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

जाणून घ्या कढीपत्ता खाण्याचे ‘हे’ फायदे

…तर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील; मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘बिग बाॅस’ फेम ‘ही’ अभिनेत्री करणार लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण?, सोशल मीडियावर रंगली चर्चा