“90% आमदार नाराज, ऐनवेळी शिवसेना-काँग्रेसचे आमदार फोडण्याचा डाव”

मुंबई | राज्यात सध्या महाविकास आघाडीत सर्वकाही चांगलं चालू असल्याचं चित्र दिसत नाही. विविध कारणांवरून महाविकास आघाडीतील नेते एकमेकांविरोधात वक्तव्य करत आहेत.

महाविकास आघाडीत चालू असलेल्या या वादाचा फायदा भाजपला होत आहे. भाजप नेते शिवसेनेला लक्ष्य करून टीका करत आहेत.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आमदारांच्या वक्तव्याचा फायदा राष्ट्रवादी घेणार असल्याचं भाकीत देखील बावनकुळेंनी केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांमध्ये निधी वाटपावरून सुरू असलेली नाराजी ही राष्ट्रवादीच्या फायद्याची ठरेल, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

शिवसेनेतील 90 टक्के आमदार सध्याच्या घडीला नाराज आहेत. भविष्यात हे आमदार वेगळा पर्याय निवडू शकतात, असा इशारा बावनकुळे यांनी शिवसेनेला दिला आहे.

यावर्षीच्या अर्थसंकल्पावर नजर टाकली तर कळेल की मंत्री आणि त्यांच्या जवळच्या आमदारांनाच झुकतं माप देण्यात आलं, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

ज्या प्रकल्पातून कमिशन मिळेल अशाच प्रकल्पांची तरतूद करण्यात आली. निधी नसल्यानं आमदारांना आता असुरक्षित वाटत आहे. परिणामी आमदार नाराज आहेत, असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं आहे.

दरम्यान, गत काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या आणि काॅंग्रेसच्या आमदारांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. परिणामी आता महाविकास आघाडीचे नेते यावर काय भूमिका घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

काळजी घ्या रे…! राज्यात उष्माघाताचा पहिला बळी; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याचा जीव गेला

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

 नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

  “संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”

  “भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…”