एक दुर्घटना अन् शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पार हादरून सोडलं. शिंदे गटाने सुरत, गुवाहाटी, गोवा दौरा करत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडलं.

शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत फुटल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. परिणामी तीन वेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येत तयार झालेलं महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळलं.

महाराष्ट्राच्या या सत्तासंघर्षादरम्यान एका आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. व्हायरल क्लिपमधील काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटेल या डायलॉगमुळे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील महाराष्ट्रात चांगलेच फेमस झाले.

आमदार निवासात झालेल्या दुर्घटनेत शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले आहेत. त्यामुळे याच शहाजी बापूंवर आता काय आमदार निवास.. काय खोली.. अन् काय ते छत म्हणायची वेळ आली आहे.

आमदार निवासातील शहाजी पाटलांच्या खोलीतील छत अचानकच कोसळलं. शहाजी पाटील देखील यावेळी खोलीत उपस्थित होते मात्र ते थोडक्यात बचावल्याने त्यांना कोणतंही नुकसान झालं नाही.

बुधवारी मध्यरात्री शहाजी बापू पाटलांच्या आमदार निवासातील खोलीच्या छताचा काही भाग अचानक कोसळला. या मोठ्या दुर्घटनेनंतर शहाजी पाटील सुखरूप आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ खोलीची पाहणी केली. तर दुरूस्तीसाठी म्हणून सध्या खोली बंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईकरांनो सावधान! मुंबईत पावसाचा तडाखा, प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चर्चेत आलेल्या ‘या’ व्यक्तिला जीवे मारण्याची धमकी

‘सौ दाऊद एक राऊत’, मनसेची संजय राऊतांवर खोचक टीका

शिवसेनेला आणखी एक धक्का! ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईत देखील खिंडार

… अन् देवेंद्र फडणवीसांनी हात धरून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं, पाहा व्हिडीओ