शाहिद कपूरचे सावत्र वडील वयाच्या 52 व्या वर्षी झाले पुन्हा बाबा

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरचे सावत्र वडील, तर अभिनेता इशान खट्टरचे सख्खे वडील पुन्हा एकदा बाबा झाले आहेत. वयाच्या 52 व्या वर्षी अभिनेते राजेश खट्टर यांना दुसरा मुलगा झाला. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने वंदना सजनानी यांनी अखेर मातृत्वसुख अनुभवलं.

असंख्य गर्भपात, आयव्हीएफ, आययूआय आणि सरोगसीचे प्रयत्न केल्यानंतर मी वडील झालो, याचा आनंद राजेश खट्टर यांनी व्यक्त केला. पन्नाशीनंतर पितृत्व अनुभवणारा मी पहिलाच नाही, असं राजेश खट्टर यांनी म्हटलं आहे.

वयाचा मुद्दा असला, तरी स्वतःच्या बाळासाठी पत्नीने सोसलेल्या यातना पाहता मी आनंद मानण्याचं ठरवलं आहे, असं खट्टर म्हणाले. वनराज कृष्ण असं त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव ठेवलं आहे.

दरम्यान, अभिनेते पंकज कपूर आणि अभिनेत्री निलीमा अझीज हे शाहीद कपूरचे सख्खे आई-वडील. तर राजेश खट्टर हे शाहीदचे सावत्र वडील आहेत.

महत्वाच्या बातम्या-