हाॅटेलच्या रूममध्ये नेमकं काय घडलं?, शेन वाॅर्नच्या मॅनेजरचा मोठा खुलासा

नवी दिल्ली | ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचं (Shane Warne) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.

केवळ 15 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शेन वाॅर्नच्या अचानक जाण्याने आता क्रिडाविश्वात सर्वांनाच धक्का बसला आहे.

अशातच शेन वाॅर्नच्या मॅनेजरने मोठा खुलासा केला आहे. जेव्हा शेनला हृदयविकाराचा झटका आला त्याआधी रात्री आपल्या मित्रांसोबत क्रिकेट पाहत होता, असं त्याच्या मॅनेजरने सांगितलं आहे.

रिपोर्टच्या माहितीनुसार, शेन वॉर्न थायलंड येथे सुट्ट्या घालवत होता. त्यानंतर तो त्याच्या असाइनमेंटसाठी यूकेला जाणार होता. यासोबतच शेन वॉर्न डायटिंग करत होता आणि त्याने मद्यपान बंद केल्याचंही मॅनेजरने सांगितलं.

वाॅर्नचा मॅनेजर अँड्यूने संध्याकाळी पाच वाजता वाॅर्नला फोन केला. मात्र, वाॅर्नने फोन उचलला नाही. त्यावेळी मॅनेजरने आणखी वाट पाहिली. सव्वा पाचपर्यंत वाॅर्न खाली आला नाही म्हणून मॅनेजरने दरवाजा ठोठावला.

वेळ झाल्यानं आपल्याला निघावं लागेल, असं मॅनेजरने वाॅर्नला दरवाजाआडून सांगितलं. मात्र, आतून काहीच रिप्लाय न आल्याने मॅनेजरला संशय आला. त्याने लगेच दरवाजा उघडण्यास सांगितलं. त्यात आणखी 15 मिनिटं गेली.

वाॅर्न बेशुद्ध असल्याचं कळताच त्यांनी शेन वॉर्नला सीपीआर दिला. सुमारे 20 मिनिटे हा प्रकार सुरू होता. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, रूग्णालयात दाखल केल्यानंतर 45 मिनिटांनी मॅनेजरला फोन आला आणि शेन वाॅर्नचं निधन झाल्याची माहिती मिळाली.

महत्वाच्या बातम्या –

सरकार म्हणजे अजित पवार ना…?, अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी; पाहा व्हिडीओ

“काही दिवसांपूर्वी शरद पवार कारण नसताना पुणे मेट्रोतून फिरुन आले”

व्लादिमीर पुतिन यांना घरचा आहेर; आता रशियन नागरिकांनी उचललं मोठं पाऊल!

“महाराष्ट्र संकटात असताना घरात बसणं मला जमलं नाही”

“हे माझ्यासाठी नाही, मला वरपर्यंत द्यावं लागतं”; महिला इन्स्पेक्टरला अटक