पत्राचाळ घोटाळ्यात आपला सहभाग आहे का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर

मुंबई | गोरेगाव पत्राचाळ घोटाळा (Goregaon Patra Chawl) प्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या गजाआड आहेत. त्यांच्यावर सक्तवसुली संचलनालय (ED) कारवाई करत आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

या पार्श्वभूमीवर अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचा (Sharad Pawar) देखील यात सहभाग आहेत, असा आरोप केला होता. तसेच त्यांंची याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र गृहखात्याला पाठविले आहे.

या आरोपांच्या आणि चौकशीच्या मुद्यावर प्रकरण तापले होते. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि शरद पवार आणि माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

यावेळी पवार म्हणाले, या आरोपाला काय आधार आहे, तो मला हवा आहे, अशी माफक प्रतिक्रिया देत पवारांनी चर्चा टाळली आणि आपले निवेदन संपविले.

शरद पवारांनी म्हाडा आणि संजय राऊत यांची एक बैठक घेतली होती. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे शरद पवारांपर्यंत जातात, असा दावा अतुल भातखळकर यांंनी केला होता.

14 ऑक्टोबर 2006 रोजी पवारांनी सदर बैठक घेतली होती, असा दावा भातखळकरांचा आहे. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांना बैठका आणि मिटींग नवीन नाहीत, अशे आव्हाड म्हणाले.

शरद पवारांनी मंत्री असताना आणि नसताना देखील अनेक बैठका घेतल्या आहेत. राज्यातील अनेक प्रकल्पांच्या बैठकीत शरद पवार होते. त्यांनी दरवेळी प्रकल्पला दिशा देण्याचे काम केले आहे, असे देखील आव्हाड म्हणाले.

या प्रकरणाची चौकशी करावी पण शरद पवार यांना बदनाम करण्याचा डाव आखला जाऊ नये. राजकीय दृषट्या कोणालाही कोणाला बदनाम करण्याचा अधिकार नाही, असे आव्हाड आणि पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

खुशखबर! भारतीय पोस्टात ‘आठवी पास’ तरुणांना नोकरीची संधी

प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधनांवर मोठी टीका; म्हणाले, दारुड्याला दारु पिण्यास…

‘राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप’

संजय राऊत यांच्याबाबात मोठी खळबळजनक माहिती समोर; बेहिशेबी रक्कम त्यांनी चित्रपट आणि मद्य…

‘विनोदाचे बादशहा राजू श्रीवास्तव कालवश’