मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं कळतंय. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही. मात्र महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आघाडी सरकारच्या नेत्यांवर तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. याबाबत दोन्ही नेत्यांच्या भेटीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

मोदी सकाळी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. त्यानंतर दुपारी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड 20-25 मिनिटे चर्चा झाली.

दरम्यान, काल खासदारांसाठी सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे चहापानाचा कार्यक्रम होता. तर रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी पवारांनी या सर्व आमदारांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपचे नेते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…म्हणून मी माझ्या प्रभागात हनुमान चालीसाचे भोंगे लावणार नाही” 

“…यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही” 

मोठी बातमी! कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय 

‘या’ 6 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज 

मोठी बातमी! संजय राऊतांचा सोमय्यांवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ