“मला काही नको… अखेरच्या श्वासापर्यंत महाराष्ट्रासाठी काम करायचंय हीच माझी इच्छा”

औरंगाबाद | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यातील मराठवाड्याचा पहिला टप्पा त्यांनी शुक्रवारी पूर्ण केला. मराठवाड्याच्या शेवटच्या सभेत बोलताना पवार चांगलेच भावूक झालेले पाहायला मिळाले. 

महाराष्ट्राने मला भरभरून दिलं. माझी आता कोणतीही इच्छा नाही. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे, असं पवार यावेळी म्हणाले.

जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केलं, देशाचा संरक्षणमंत्री केलं, 10 वर्षे कृषीमंत्री केलं. जनतेने मला भरभरून दिलं आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

या वयात तुम्ही का फिरता असं लोक मला म्हणतात. पण माझं काही वय झालेलं नाही. नवी पिढी, शेतकरी, कामगार, भटके, अल्पसंख्याक, महिला, दलित, आदिवासींना पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्र व देशाला पुढं नेण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. तेच कष्ट मी करतो आहे, असंही पवार म्हणाले.

देशासमोर आज मोठे प्रश्न आहेत. शेतकरी, तरूण, कामगार अडचणीत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते काही करायला तयार नाहीत, असा टोमणा त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या-