….तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल; पवारांनी व्यक्त केली भिती

बारामती |  भांडवली गुंतवणूक वाढत नाही तोपर्यंत मंदीतून बाहेर पडणं अशक्य आहे. देशात निर्माण झालेल्या मंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका बसलाय. हे प्रमाण वाढत राहिलं तर अनेकांच्या हाताला कामच राहणार नाही. पर्यायाने देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी देशात निर्माण झालेल्या मंदीवर आपलं मत व्यक्त केलं.

काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेल्या काबाडकष्टामुळे आज देशात शेतमालाची कमतरता नाही. एकेकाळी आयात करणारा भारत देश निर्यातदार बनलाय. मात्र असं असलं तरी सरकारच्या धोरणामुळे अनेकदा संकटं येतात, असं ते म्हणाले.

सामान्य माणसाची खरेदी करण्याची ताकद वाढत नाही, तोपर्यंत व्यापार वाढत नाही, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-