“नाठाळ बैलांना मतदानाच्या दिवशी बाजार दाखवा”

जालना | बैलजोडीत काही बैलं नाठाळ असतात. नांगरणी करताना काही बैलं वाकडे चालतात. मग आपण त्यांची जागा अदलाबदल करतो तरी तो नाठाळ बैल तसा वागला तर त्याला आठवड्याचा बाजार दाखवतो. आज काही बैल तसेच झाले आहे. मतदानाच्या दिवशी यांना बाजार दाखवा, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते काल(शुक्रवार) जालन्यात होते. त्यावेळी पक्ष सोडून गेलेल्यांवर त्यांनी शरसंधान साधलंं.

एकदा काय उन्हाळा आला तर पक्षबदलूंनी पळापळी सुरू केली आहे. या साऱ्यांचा विकास आपण मिळून करू. जास्त दिवस राहिले नाहीत. मतपेटीत आपले मत टाकून आपण यांना उत्तर देऊ, असंही ते म्हणाले.

काही जण आज पक्ष सोडून जात आहेत. मराठवाड्यातील काही नेते सोडून गेले आहेत. म्हणतात, आम्हाला विकास करायचा आहे. अरे तुम्हाला इतकी वर्षे सत्ता दिली तेव्हा काय केले? या जनतेने मोठे केले, पक्षाने हवे ते दिले. तरी गद्दारी करता?, असा सवाल त्यांनी पक्ष राष्ट्रवादी सोडून भाजप-सेनेत जाणाऱ्यांना विचारला आहे.

आजचा तरूण शांत आहे. उद्या ही तरूण मंडळी संतप्त झाली तर हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय हे स्वस्थ बसणार नाहीत, असा विश्वास त्यांनी तरूणाप्रती व्यक्त केला. 

महत्वाच्या बातम्या-