Sharad Pawar: शरद पवारांना UPA अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली | सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजकारणात एन्ट्री केल्यानंतर काँग्रेसमध्ये (Congress) मोठी खळबळ उडाल्याचं काही वर्षांपूर्वी पहायला मिळालं होतं. त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि इतर नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपापला स्वतंत्र पक्ष तयार केला.

काँग्रेसमधून बाहेर आल्यानंतर देखील शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करून नंतरच्या काळात काँंग्रेससोबत आघाडी बनवली. 2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी यांनी विविध राजकीय पक्षांना एकत्र घेऊन यूपीएची स्थापना केली होती.

मात्र, 2014 नंतर काँग्रेसला उतरती कळा लागल्याचं पहायला मिळतंय. 2014 आणि नंतर 2019 मध्ये दारूण पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या 5 राज्याच्या निवडणुकीच्या निकालात देखील काँग्रेसची धुळधाण झाली.

अशातच आता काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढल्याचं पहायला मिळतंय. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी खुलेआम काँग्रेस नेतृत्वावर टीका केली आहे. अशातच आता मोठी मागणी केली जात आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवार यांना युपीए अध्यक्ष (UPA President) करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा प्रस्ताव मांडला गेला.

दरम्यान, युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवारांची निवड व्हावी, अशी मागणी याआधी देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा शरद पवार यांना अध्यक्ष करा, अशी मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा

काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…

 Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज

“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं” 

“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर”