Sharad Pawar: “शरद पवार आपण देशाचे पंतप्रधान व्हावे”

सांगली | मागील 8 वर्षापासून केंद्रात भाजपने आपली आघाडी कायम ठेवल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या 8 वर्षात काँग्रेस भुईसपाट होत असल्याचं चित्र आहे. मागील पाच राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

या पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळीला वेग आला होता. काँग्रेसचे दिग्गज नेत्यांनी खुलेआम पत्रकार परिषद घेत पक्ष नेतृत्वावर सवाल उपस्थित केले होते. त्यामुळे आता काँग्रेस वगळता आणखी तिसरा पर्याय देशाच्या राजकारणात शोधण्याचा प्रयत्न होत आहे.

काही दिवसांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवार (Sharad Pawar) यांना युपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला गेला होता. त्यामुळे शरद पवार पुन्हा दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार का?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

अशातच आता भाजपचे जवळचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे अशी इच्छा असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जानकर पारडं बदलणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

एसटीच्या सवलती पवार साहेबांनीच दिल्या. आम्ही प्रयत्न केले. धनगर समाजासाठी एसटीच्या 13 योजना मी बनवल्या. 1 हजार कोटी रुपये दिले, असं जानकर म्हणाले आहेत.

दरम्यान, एसटी समाजातील मुले भविष्यात आएएस, आयपीएस होतील. बाप हा बाप असतो आणि नेता हा नेता असतो, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

शिवसेना भवन परिसरात मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं

 काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला

‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

“भापमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं”