नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईमुळे राज्यात चांगलाच वाद रंगला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात तब्बल 25 मिनिटे संभाषण झालं. त्यावर आता पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी भेटीत नेमकं काय झालं?, याची उत्तरं दिली आहे.
शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?, असा सवाल विचारला जात होता. त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, असं थेट उत्तर शरद पवारांनी दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार आणि त्यानंतर पुढील पाच वर्षात देखील सत्तेत येणार, असं शरद पवार म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईवर पंतप्रधानांची चर्चा केली, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यावर पंतप्रधान सकारात्मक भूमिका घेतील, असंही पवार म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“…तर पवारांची औलाद सांगणार नाही”, अजितदादांनी दंड थोपटले
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात
“अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा…”, अजित पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल