महाराष्ट्र मुंबई

“महापूर तीन जिल्ह्यातील प्रश्न आहे, त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याची गरज नाही”

मुंबई : पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आता वेळ घालवून चालणार नाही. राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लवकर निर्णय व्हावेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. महापूर हा तीन जिल्ह्यातील प्रश्न आहे. त्यासाठी संपूर्ण राज्याची निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवार यांनी म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्य सरकारने महापूर आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडे 6 हजार 800 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. मात्र महापुरामुळे झालेलं नुकसान मोठं आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

पूरग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आचारसंहितेची अडचण येऊ शकते. त्यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्या, अशी मागणी महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र, राज ठाकरे यांची मागणी संयुक्तिक नाही, असंही शरद पवार म्हणाले. 

कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यात आलेल्या भीषण पुराची पाहणीसाठी शरद पवार गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबत आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असल्याने राज्याच्या मागणीप्रमाणे केंद्राने अर्थसाहाय्य करावं. गरज पडली तर कर्ज काढूनही मदत केली पाहिजे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“नारायण राणेंनी शिवसेना सोडून चूक केली”

-…आता खासदार झालो तेही माझ्या मर्जीने नाही- नारायण राणे

-मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर शिवसेना समाधानी!

-रवी शास्त्रींची पुन्हा एकदा भारताच्या प्रशिक्षकपदी निवड!

-“महापालिकेचे 58 हजार कोटी फिक्स डिपॉझिट तरीही मुंबई दर पावसाळ्यात तुंबते”

IMPIMP