“हल्लीच्या राज्यपालांवर न बोललेलं बरं”; शरद पवारांचा राज्यपालांना टोला

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टोलेबाजी केलीय. भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखं कर्तृत्ववान राज्यपाल पाहिले नाहीत, असं शरद पवार म्हणालेत.

केंद्र सरकार घसरून कोणत्या पातळीवर जात आहे याचं उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे, अशी टीका शरद पवारांनी भगतसिंह कोश्यारींवर केली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हल्लीच्या राज्यपालांवर न बोललेलं बरं. केंद्र सरकार कोणत्या पातळीवर जात आहे हे महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. राज्य मंत्रिमंडळाला विधान परिषदेवर सभासद नेमण्याचा अधिकार आहे. मात्र, वर्ष होऊन गेलं तरी 12 आमदारांच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही. याचा अर्थ काय? असा सवाल शरद पवारांनी केला आहे.

ज्या पदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली, ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेवून कुणी काम करत असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीही याचा विचार केला पाहिजे, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे मला असं वाटतं की जाणीवपूर्वक असंविधानिक कृती करायच्या आणि राज्यपालांविरोधात बोलायचं. एकप्रकारे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न हा सातत्याने सुरु आहेय. पण मला असं वाटतं की राज्यपाल हे एका संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते संविधानानेच काम करतात. त्यामुळे अशाप्रकारे त्यांना टार्गेट करणं हे अतिशय अयोग्य आहे, असं फडणवीस म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

“ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर टीका केली, त्याच नेहरूंच्या धोरणाने नरेंद्र मोदींना वाचवलं” 

उद्धव ठाकरेंबाबत नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ 

कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा?; जाणून घ्या एका क्लिकवर 

“शरद पवार म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, त्यांनी पावसातली सभा गाजवली पण…” 

आत्ताची मोठी बातमी! युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवली ‘ही’ अट