देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra budget session) सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी, आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली.

सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विरोधी पक्षातील नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या (Bjp) एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे, त्याची सत्यता पडताळा असं मी देवेंद्र फडणवीसांना(Devendra fadnavis) सांगितलं होतं. एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक जीवनात कार्यरत असेल तर शहानिशा न करता त्यावर बोलणं योग्य नसतं, असं शरद पवार म्हणालेत.

ही रेकॉर्डिंग खरी आहे की नाही ते सिद्ध झालं पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता, असत्यता तपासेल. त्यात माझंही नाव घेतलेलं दिसतं. माझं कधी या संबंधात कुणाशी बोलणं व्हायचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधीत 125 तासांची रेकॉर्डिंग करण्यात फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

125 तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंगचं काम करण्याचं काम खरंच झालं असेल तर त्यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. त्यामुळे एखाद्या राज्यात जाऊन, राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात जाऊन तास न् तास रेकॉर्डिंग करायला ते यशस्वी झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या –

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या” 

पुन्हा सत्तेत आल्यास योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, जाणून घ्या सविस्तर 

गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?; पी. चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य 

“म्हणजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही”