स्टेजवरंच उर्वशीसोबत जे घडू नये ते घडलं, ड्रेस खाली सरकला अन् मग…; पाहा व्हिडीओ

मुंबई | बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेच कलाकार सोशल मीडियावर खूप जास्त ऍक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर सतत काही न काही शेअर करत कलाकार आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील सोशल मीडियावर काही न काही शेअर करत असते. यामुळे ती खूप जास्त चर्चेत राहते.

आता उर्वशीने सोशल मीडियावर रॅपर हनी सिंग बरोबरच्या आपल्या एका आगामी गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. उर्वशीचा हनी सिंग सोबतच्या ‘लव डोज’ या गाण्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला लवकरंच येत आहे.

याच गाण्याची घोषणा करतानाचा एक व्हिडिओ उर्वशीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडीओमध्ये उर्वशी हनी सिंगसोबत लव्ह डोज या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

उर्वशीच्या आजूबाजूला खूप सारे लोक देखील उपस्थित आहेत. मात्र, स्टेजवर डान्स करत असताना उर्वशीचा ड्रेस अचानक खाली घसरतो. हनी सिंगच्या हे लक्षात येतं आणि तो परस्थिती खूप शिताफीने सांभाळतो.

उर्वशीचा ड्रेस खाली सरकल्याचं लक्षात येताच हनी सिंग जोरजोरात डान्स करू लागतो. यावेळी सर्व प्रेक्षकांना तो आपल्याकडे वेधून घेतो आणि तेवढ्या वेळात उर्वशी स्वतःचा ड्रेस सावरते. उर्वशी पुन्हा काहीच झालं नाही असं दाखवत डान्स करू लागते.

उर्वशीने स्वतः हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, ‘हेट स्टोरी 4’ या चित्रपटातील उर्वशीचा बोल्ड अंदाज पाहून अनेक लोक घायाळ झाले होते. या चित्रपटात ती जास्त कमाल दाखवू शकली नाही. मात्र, चित्रपटानंतर ती सतत या न त्या कारणाने चर्चेत असते.

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट पडणार? महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

कोरोना नियमांचं उल्लंघन करणं पडलं महागात, ‘या’ अभिनेत्रीवर झाला गुन्हा दाखल

ठाण्यात मेन रोडवर कार झाडाला धडकून जागेवर पलटली अन् मग…; पाहा व्हिडीओ

कचरा गोळा करणाऱ्या भावांना मिळाली ‘या’ शोमध्ये गाण्याची संधी, लोकांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा व्हिडीओ

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती