शिंदे सरकारची 4 तारखेला बहुमत चाचणी, मुख्यमंत्री म्हणतात…

मुंबई | 10 दिवसांच्या सत्ता नाट्यानंतर अखेर महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं आहे. बंडखोरी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहेत. राज्यात नवं सरकार स्थापन होऊन 24 तासंही उलटले नाहीत तोपर्यंतच राज्यपालांनी शिंदे सरकारला बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत.

राज्यपालांच्या आदेशानुसार 4 जुलै रोजी शिंदे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. सर्वांचं लक्ष आता बहुमत चाचणीकडे लागलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

बहुमत चाचणीला सामोरं जाण्यापूर्वीच आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर आम्ही बहुमत सिद्ध करू, असा विश्वास देखील एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.

आमच्याकडे 170 आमदारांचं समर्थन आहे. फ्लोर टेस्टला आम्ही बहुमत सिद्ध करू, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्याबाहेर असणारे सर्व आमदार मुंबईत येणार असल्याची माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे आता 4 तारखेला शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्यात यश मिळेल का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

नीरज चोप्राने रचला आणखी एक इतिहास, मोडला स्वत:चाच विक्रम

काय सांगता? कोरोना व्हायरसमागे एलियनचा हात?, किम जोंग उनच्या दाव्याने खळबळ

सर्वांचं प्रेम जर क्वचित कुणाला लाभलं असेल तर मला लाभलंय- उद्धव ठाकरे

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परताल वाटलं होतं पण…’, राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र