“सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारीसाठी मला भेटत आहेत”

मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी अवघा दीड महिना शिल्लक राहिला आहे. सगळेच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहे. त्यातच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सेना-भाजपच्या नेत्यांबद्दल गौप्यस्फोट केला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमकडून उमेदवारी मिळावी म्हणून सेना-भाजपचे लोक मला येऊन भेटत असल्याचा दावा जलील यांनी केला आहे. मालेगावमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा एमआयएमच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारी मागत असल्याच्या इम्तियाज जलील यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सेना भाजपचे अनेक नेते एमआयएमकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी करत असल्याचा खुलासा जलील यांनी केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-