मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बीकेसीत सभा घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद आता उमटत आहेत.
उद्धव ठाकरेंनी आरएसएस, भाजप, राणा दाम्पत्य, मनसे यांच्यावर यथेच्छ टीका केली होती. त्यानंतर सर्वांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. अशात आता शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे.
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात आरएसएस आणि भाजपवर हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली होती. ही टीका शिवसेनेचे नेते शाम देशपांडे यांना पसंत पडली नाही.
पुण्याचे माजी शहरप्रमुख शाम देशपांडे यांनी शिवसेनेला अखेरचा रामराम ठोकला आहे. परिणामी सध्या देशपांडेंच्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा आहे.
शिवसेना-भाजप युती तुटल्यानं अनेक शिवसैनिकांना दुख होत आहे. त्यातच उद्धव ठाकरेंनी आरएसएसवर टीका केल्यान क्लेश होत आहे, असं देशपांडे म्हणाले आहेत.
भाजपच्या पुर्वीही संघ होता. संघाला राजकारणात ओढायची गरज नव्हती. संघाला राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षवादाचा पट्टा घट्ट केला आहे, असंही देशपांडे म्हणाले आहेत.
संघाच्या हिंदूत्त्वाला आक्रमक दिशा बाळासाहेबांनी दिली. पण आता उद्धव ठाकरेंनी आरएसएसवर टीका करून ती दिशा भरकटवली आहे, असंही देशपांडे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“…तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू”
“स्वत:च्या बायकोला लोक बोलली तर इतरांना पुढं करता का?”
“कारवाई न झाल्यास जशास तसं उत्तर देऊ”; देवेंद्र फडणवीस आक्रमक
“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही”
“कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल