Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“देवेंद्र फडणवीस अनाजीपंत झालेत, ते आता फडणवीस राहिले नाहीत”

devendra naraj

मुंबई | शिवतीर्थावर घेतलेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीकेचा बाॅम्ब फोडले. राष्ट्रवादीवर थेट जातीवाद पसरवण्याचा आरोप केला. तर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील घणाघाती टीका केली.

राज ठाकरे यांच्या वादळी सभेनंतर आता राजकीय वर्तुळात मोठा खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांना उधाण आल्याचं पहायला मिळत आहे.

अशातच आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मनसेवर टीकास्त्र सोडल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडल्याचा दावा केला होता, त्यावर सावंत यांनी भाष्य केलं आहे.

केवळ सत्तेसाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली होती. तुमच्यात जर काही फॉर्म्युला ठरला होता तर तो तुम्ही जाहीरपणे का सांगितला नाही?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना भेटले म्हणून काही फरक पडत नाही. फडणवीस यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते एकमेकांना मदत असल्याचं सावंत म्हणाले आहे.

मनसे बिनबुडाची झाली आहे. त्यामुळे मनसेला बुडही नाही आणि शेंडाही नाही. मनसेचा झेंडा बदलला तसा त्यांचा विचारही बदलला, असं सावंत यावेळी म्हणाले. फडणवीस अनाजीपंत झाले आहेत. ते आता फडणवीस राहिले नाहीत, असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर देखील निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आता हिंदूत्वातची कास पडल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता येत्या काळात भाजप आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

प्रवीण दरेकरांची तब्बल 3 तास चौकशी; बाहेर आल्यावर म्हणाले “मला भंडावून…”

“मी टाईमपास टोळी म्हणायचो पण आता…”, आदित्य ठाकरे राज ठाकरेंवर बरसले

Gold Silver Rate: सोने-चांदी दरात मोठी घसरण, वाचा काय आहे आजचा भाव

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाचा झटका 

चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, अत्यंत धक्कादायक बातमी समोर