Top news महाराष्ट्र मुंबई

JIO च्या ग्राहकांसाठी खुशखबर; ‘या’ Plan वर मिळतोय जबरदस्त कॅशबॅक

jio pack

मुंबई | तुम्हीही Jio ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. Reliance Jio 2,999 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2.5GB दररोजच्या डेटासह 20 टक्के कॅशबॅक देत आहे.

या वर्षाच्या प्रीपेड ऑफरमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा आहे. त्याशिवाय JioMart वर 20 टक्के डिस्काउंटही मिळेल.

2,999 रुपयांच्या या प्रीपेड रिचार्जवर 912.5GB डेटा मिळेल. या Recharge Plan ची वॅलिडिटी 365 दिवस आहे. JioMart वॉलेटवर मिळणाऱ्या 20 टक्के कॅशबॅकचा तुमच्या पुढील रिचार्जसह JioMart आणि रिलायन्स स्टोरवर खरेदीसाठी वापर करू शकता.

या रिचार्जसह युजर्सला 4 Jio App चं सब्सक्रिप्शनही मिळेल. ज्यात JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सामिल आहे.

दरम्यान, Reliance Jio चे काही इतर Recharge Plan देखील आहेत, जे JioMart महा कॅशबॅक ऑफर अंतर्गत मिळतात. यात दुसरी ऑफर 719 रुपयांच्या Plan वर आहे. याची वॅलिडिटी 84 दिवस आहे. यात दररोज 2GB डेटा मिळतो.

जिओनं जेव्हापासून या क्षेत्रात प्रवेश केला आहे, तेव्हापासून इतर मोठमोठ्या कंपन्यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला आहे. त्यात सर्वात वाईट हाल वोडाफोन-आयडियाचे झालेले पहायला मिळत आहे.

दोन कंपन्या एकत्र आल्यानंतरही त्यांच्या अ़डचणी कमी होण्याची चिन्हं नाहीत. त्यातचं आता जिओने नवीन ऑफर आणल्याने इतर कंपन्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

दरम्यान, देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी Airtel आणि Vodafone idea ने टॅरिफच्या किंमतीत वाढ केल्यानंतर ऑफरमध्ये देखील बदल केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 “संजय राऊतांना जगावर बोलण्याचा अधिकार, त्यांना सर्व जगाचं कळतंय”

राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधील गुतंवणूक केली कमी! 

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘ती’ पुन्हा येतेय…, टाटाची जबरदस्त कार लवकरच येणार बाजारात 

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर