पुणे महाराष्ट्र

“अजित पवार यांना माझं कालही आव्हान होतं… आजही आहे… अन् उद्याही राहणार”

पुणे |  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेली टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आढळराव पाटलांनी शिरूरमध्ये पत्रकार आयोजित केली होती. यावेळी अजित पवारांसह त्यांनी राष्ट्रवादीचा यथेच्छ समाचार घेतला.

माझ्या राजकीय जीवनात मी शरद पवार साहेबांना कधीही आव्हान दिलं नाही. पण शिरूरमध्ये माझ्याविरोधात लढण्याची आणि औलाद सांगण्यापर्यंतची भाषा अजित पवार यांनी वापरली होती. त्यांच्यात जर हिम्मत होती तर मग का माझ्याविरोधात उभे राहिले नाही? घाबरून घरी बसणाऱ्यापैंकी मी नाही. अजित पवार यांच्यासारख्यांना माझं कालही आव्हान होतं… आजही आहे… अन् उद्याही राहिल, असं शिवाजीराव आढळराव म्हणाले आहेत.

मी शिवरायांचा मावळा आहे.  मी कुणाला घाबरत नाही हे सांगणे म्हणजे अहंकार किंवा दर्पोक्ती नाही. अजित पवार यांच्या आव्हानाला माझं कायम प्रतिआव्हान असेल, असंही आढळराव पाटील म्हणाले.

आढळरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. बांदल, मोहिते हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. मारामाऱ्या, दंगली तुम्ही घडवायच्या, जमीन व्यवहारातून लोकांची फसवणूक तुम्ही करायची, खंडणी तुम्ही गोळा करायची आणि पोलिसांनी कारवाई केल्यावर नाव आढळराव पाटलांचं घ्यायचं, हे कुठलं राजकारण? अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.

मी अतिशय सामान्य घरातून आलेलो आहे. माझे काका मुख्यमंत्री किंवा केंद्रिय कृषीमंत्री नव्हते. मी पराभूत जरी झालो असलो तरी शिवसेनेने माझा योग्य सन्मान केला आहे, असंही ते म्हणाले

दरम्यान,  शरद पवार येऊ द्या किंवा अजित पवार येऊ द्या… असं म्हणणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटलांची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मस्तीच जिरली, अशी टीका अजित पवार यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

अजित पवार घरभेदी; स्वतःच्या दिवट्यासाठी पवार साहेबांनाही अव्हेरलं!

-भाषणादरम्यान शेतकरी ओरडला गावात दवाखाना नाही; लगोलग आदित्य ठाकरे म्हणाले…

पक्षांतराच्या काळात राष्ट्रवादीचा आमदार म्हणतो; माझे तत्व एकच ‘पवार एके पवार…’

विश्वविजयानंतरही इंग्लंडचा कर्णधार नाराज; म्हणतो…

-राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार???; अजित पवार म्हणतात…

IMPIMP