…म्हणून मी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात आलो- आमदार शिवेंद्रराजे भोसले

सातारा | शिवेंद्रराजे भोसले यांनी मनगटावरचं राष्ट्रवादीचं घड्याळ काढून हाती भाजपचा झेंडा घेतला.  साताऱ्यात त्यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी पक्ष का सोडला याचं खरं कारण सांगितलं.

माझ्या मतदारसंघातील कुरघोड्यांबद्दल मी शरद पवारांना अनेकदा सांगितलं. पवारांनी मला जे काही वाद असतील ते मिटवतो, असं आश्वासनही दिलं. मात्र कित्येकदा सांगूनही त्यांनी ते वाद सोडवले नाहीत. म्हणून मी राष्ट्रवादीला रामराम ठोकला, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत शिवेंद्रराजे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत म्हणून त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला.

माझ्या पक्षातील कुरघोड्यांमुळे दगाफटका झाला आणि मला सत्तेपासून दूर रहावे लागले. तर मला कोणीही विचारणार नाही. शिवाय माझे कार्यकर्तेही मला विचारणार नाही, असंही शिंवेंद्रराजे म्हणाले.

माझ्या कामात जो अडथळा आणेल त्यांचा काट्याने काटा काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं खुलं आव्हानही त्यांनी विरोधकांना केलं.

महत्वाच्या बातम्या-

…तर फडणवीस साहेब, तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही!

-विजय वडेट्टीवार यांचा शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट! राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

-जितेंद्र आव्हाडांच्या बोचऱ्या टीकेला शिवेंद्रराजेंचं खरमरीत प्रत्युत्तर!

-“शरद पवार हृदयात आहेत असं म्हणणाऱ्यांचं हृदय मला चेक करावं लागेल”

-शरद पवारांनी माझं सरकार पाडलं, सर्वांना त्रास दिल्यानेच आज त्यांची अवस्था अशी!