“अनिल देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे नेते कोठडीत”

मुंबई | अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील असंही वारंवार सांगितलं जात आहे. पण तुम्हाला सांगतो, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

आय रिपीट. आता बस्स झालं. राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता तुम्हाला कळेल काय असतं ते. हमाम में सब नंगे होते, असं वक्तव्य राऊतांनी केलंय.

जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर जो काही आरोपांचा चिखल उडवला जातोय त्याला आम्ही उत्तर देऊ, असं राऊत म्हणालेत.

एक मर्यादा असते राजकारणात. तुम्ही ती ओलांडली आहे. सर्वांना माहीत आहे मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलत आहे. माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडाली आहे, असंही राऊत म्हणाले.

आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. मी तर नाहीच नाही. एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा, असा इशारा देखील संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल. देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असं काही सांगितलं जात आहे. पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या- 

डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर

राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; एका दिवसात झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान 

“महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात” 

राष्ट्रवादीला मोठा झटका, ‘इतक्या’ नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

रूपाली पाटलांची किरीट सोमय्यांवर टीका, म्हणाल्या, ‘लबाड लांडगा…’