“भाजपचा जन्म पवित्र झग्यातून झाला नाही, तुमच्याच अंगावर तुमचंच प्रकरण उलटलंय”

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाचा जन्म काही पवित्र झग्यातून झालेला नाही. हा पक्षसुद्धा इतर राजकीय पक्षांप्रमाणे हाडा-मांसाचाच बनलेला आहे. त्यांचेही पाय मातीचेच आहेत. हे त्यांच्या प्रमुख लोकांनी समजून घेतलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

सत्तेची तागडी वर खाली होतच असतं, हे त्यांनी विसरू नये. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून या पक्षाने महाराष्ट्रात जो धुमाकूळ घातला आहे त्यातलं एक एक प्रकरण त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

गुजरातमध्ये सापडलेल्या 3500 किलो हेरॉईनवर मुंबईच्या क्रुझवरील एक ग्रॅम चरस भारी पडले. प्रश्न शाहरुखच्या मुलाचा नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या चारित्र्य दर्शनाचा आहे, असं राऊतांनी अग्रलेखात म्हटलंय.

आर्यन खान प्रकरणात ‘वसुली’ करणाऱ्यांच्या हाती पक्षाच्या नाड्या आहेत. या नाड्यांची गाठ कधीही सैल होईल व उघडे आहेत ते नागडे होतील, असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय.

25 कोटींचं वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मालक आणि त्यांच्या नोकरांनी सावध राहावं, असा इशारा सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?. असा खोचक सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर लेटर बॉम्ब; केला मोठा गौप्यस्फोट

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली ‘ही’ भेट!

येत्या महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का?; जयंत पाटलांच मोठं वक्तव्य म्हणाले…

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये मोठा बदल, वाचा आजचा दर

मलिकजी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका- समीर वानखेडे