मुंबई | शिवसेनेत बंड झाल्यापासून शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. एक एक करत शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक आणि माजी आजी पदाधिकारी आणि नेते शिवसेनेला सोडून शिंदे यांच्या गोटात सामिल होत आहेत.
शिवसेनेची धडाडती तोफ आणि भाजप आणि केंद्र सरकारला न जुमाणनारे संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने केलेली अटक, यामुळे शिवसेनेचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) संपते की काय? असा सर्वांना प्रश्न पडला आहे.
त्यावर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी भाष्य केले आहे. त्यांनी शिवसेनेच्या सध्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
देशात कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपसोबत सामना करण्याची कुवत नाही. आता देशातील बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील आणि एकच राष्ट्रीय पक्ष म्हणून देशात फक्त भाजप (BJP) राहिल, असे नड्डा म्हणालेत.
आजच्या स्थितीत कोणताही राजकीय पक्ष नाही जो भाजपला पराभूत करु शकेल. तसेच आता शिवसेना देखील संपत चालली आहे, असा धक्कादायक दावा भाजपच्या सर्वोच्च अध्यक्षांनी केल्याने राजकरणात खळबळ उडाली आहे.
आता महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष शिवसेना संपणार असून फक्त कमळ फुलणार असं देखील नड्डा म्हणाले आहेत. ते पटना (Patana) येथे एका जाहीर सभेत बोलत आहेत. राज्यतील 16 जिल्ह्यांच्या भाजप कार्यालयांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आपल्या भाषणात त्यांनी प्रादेशिक पक्ष राजद (RJD) आणि देशातील इतर पक्षांवर निशाणा साधला. अनेक राज्यातून काँग्रेस आता संपत चालली आहे. भाजप कार्यालये ही भाजप कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस आहेत, असे नड्डा म्हणाले.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जे पी नड्डा यांनी यावेळी भाजपची चाललेली घोडदौड आणि देशातील प्रादेशिक पक्षांचे चाललेले हाल यावर भाष्य केले. त्यांनी बिहार (Bihar), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) प्रादेशिक पक्ष संपणार असल्याचा दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
संजय राऊतांच्या अटकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
‘हे काही शहाणपणाचं नाही’, राज्यपालांविरोधात शरद पवार आक्रमक
राज्यापालांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रकाश आंबेडकरांचं समर्थन, म्हणाले…
‘दरवेळी उपलब्ध असलेले फडणवीस आता कुठे गेले?’, सुप्रिया सुळेंची टोलेबाजी