मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीच्या कारणांमुळे अयोध्या दौरा रद्द केला. त्यातच शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त शिवसैनिक मोठ्या प्रमाणात एकत्र आले आहेत.
अयोध्येला जाणारी स्पेशल ट्रेन दाखल होताच ठाणे रेल्वे स्थानकावर शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैंनिकांनी तुफान गर्दी केली. यावेळी शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने ठाणे रेल्वे स्थानक दुमदुमलं.
‘घर मे बैठा नकली, अयोध्या जा रहा है असली’, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘वाघ आला रे वाघ आला’, अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक स्पेशल ट्रेनमधून अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर आदित्य ठाकरे देखील उद्या अयोध्येला जाण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त शिवसेना अयोध्येत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करणार आहे. तर आदित्य ठाकरेंसह शिवसेना खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार खासदार देखील 15 तारखेला अयोध्येत दाखल होणार आहेत.
युवासेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौरा ऐतिहासिक होईल असं सांगतानाच महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांसह उत्तर प्रदेशातील अनेक तरूणही या दौऱ्यात सहभागी होणार असल्याची माहिती वरूण सरदेसाईंनी दिली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर शिवसेनेने तुफान टोलेबाजी केली. तर राज ठाकरेंनी त्यांचा अयोध्या दौरा जाहीर करण्यापूर्वीच आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी सुरू असल्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या-
“राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या, आगे आगे देखो होता है क्या”
डॉ. प्रकाश आमटेंची कॅन्सरशी झुंज; तब्येतीबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
सदाभाऊ खोत यांच्याकडून अखेरच्या क्षणी माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?
“मुख्यमंत्री वेळच देत नाहीत, आमचा एकच आधार ते म्हणजे अजित पवार”
‘अजितदादा परत आमच्यासोबत या’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ