चित्रपट सृष्टीला आणखी मोठा धक्का! पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त ‘हा’ दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड

कोलकत्ता | 2020 हे वर्ष चित्रपट सृष्टीसाठी अतिशय दुःखद ठरलं आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी या वर्षात जगाचा निरोप घेतला असल्यानं चित्रपट सृष्टी दुःखात बुडालेली आहे. अशातच आता चित्रपट सृष्टीला आणखी मोठा धक्का बसला आहे.

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. कोलकत्ता येथील एका खाजगी रुग्णालयात सौमित्र यांच्यावर उपचार चालू होते. मात्र, उपचारादरम्यान सौमित्र यांचा मृ.त्यू झाला आहे

6 ऑक्टोबर रोजी सौमित्र यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यानंतर सौमित्र यांच्यावर उपचार चालू होते. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. मात्र, डिस्चार्ज नंतर पुन्हा सौमित्र यांची प्रकृती खालावली होती.

यामुळे त्यांना पून्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून ते रुग्णालयात मृ.त्यूशी झुंज देत होते. मात्र, आज अखेर त्यांची ही झुंज थांबली आणि त्यांचे उपचारादरम्यान नि.धन झाले.

सौमित्र यांचे वय 85 वर्ष होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना दुसरा आजार जडला होता. त्यांच्या रक्तातील युरिय आणि सोडियमचे प्रमाण वाढले होते. डॉक्टरांनी संपूर्ण प्रयत्नांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर डॉक्टरांना अपयश आलं.

दरम्यान, सौमित्र चॅटर्जी यांनी सत्यजित राय यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सौमित्र चॅटर्जी यांचे भारतीय सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान होतं.

सौमित्र यांना अभिनय क्षेत्रातील 3 राष्ट्रीय पुरस्कार, 7 फिल्मफेअर अवार्ड आणि भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच सौमित्र यांना फ्रान्सचा Ordre des Arts et des Lettres हा सर्वोच्च पुरस्कार देखील मिळाला आहे. फ्रान्सचा हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.

सत्यजित राय यांच्या अनेक चित्रपटांमध्ये सौमित्र यांनी काम केलं आहे. 1959 साली चित्रपट सृष्टीत आलेल्या सौमित्र यांनी 1990 पर्यंत अनेक चित्रपटांत काम केलं आहे. त्यांच्या नि.धनानंतर अनेक दिग्गज लोकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! घटस्फो.ट घेण्याआधी भर कोर्टात पत्नी म्हणाली मला पतीपासून गरोदर…

दिवाळीत सुशांतच्या चाहतीने केलेल्या ‘या’ गोष्टीमुळे सोशल मीडियावर झालं भरघोस कौतुक

कतरिनाचे ‘हे’ फोटो तुम्हाला करतील घायाळ! वाचा कतरिना कुठे करतेय हे फोटोशूट?

हिंदू दिवाळी सण का साजरी करतात? सविस्तर वाचा 3000 वर्षांपूर्वी आर्यकाळात काय घडलं होतं?

धक्कादायक! आमदार रवी राणांचा जेलमध्ये अन्नत्याग तर खासदार नवनीत राणांचं जेलबाहेर धरणं आंदोलन