नवाब मलिक प्रकरणी ईडीच्या तपासातून धक्कादायक खुलासा!

मुंबई | मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा त्रास कमी होताना दिसत नाहीये. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी मलिकच्या संबंधांचे भक्कम पुरावे असल्याचं ईडीने सांगितलं.

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा आरोपी दाऊद इब्राहिमचा भाचा अली शाह पारकर याच्या वक्तव्यासह राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याविरुद्ध अनेक पुरावे गोळा केलं असल्याचं तपास संस्थेने म्हटलं आहे.

हसिना पारकरने कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडचा काही भाग 1996 मध्ये मलिकला विकला होता. आपल्या निवेदनात पारकर यांनी जमिनीच्या खरेदी-विक्रीचे अनेक तपशील दिले आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि मलिक यांच्या विरोधात खटला चालवण्यास मोठा मदत होणार असल्याचं कळतंय.

यापूर्वी, राष्ट्रवादीच्या नेत्याला ईडीने मनी लाँड्रिंग आणि टेरर फायनान्सिंगच्या आरोपाखाली फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलम 50 अंतर्गत दाऊदचा भाचा अली शाह याचे जबाब नोंदवले आहेत.

हसीना पारकर हिचे दाऊदसोबत आर्थिक व्यवहार होते. त्यांनी सलीम पटेल यांचं नाव घेतलं जे हसिनाचे सहकारी होते. पटेल हे कांद्याचे व्यापारी होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली!

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं; मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच केली हकालपट्टी 

 ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला केएल राहुल

“शरद पवार मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन” 

“भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?”