एनसीबी चौकशीवेळी आर्यन खानने कुटुंबाबद्दल केला ‘हा’ धक्कादायक खुलासा!

मुंबई | एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह सात जणांना रविवारी अटक केली. या प्रकरणी आर्यन खानला येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली.

गेल्या तीन दिवसांपासून आर्यनसह इतर सात जणांची एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी, खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे आर्यन खान प्रकरणामुळे बॉलिवूडमधील अनेक खासगी गोष्टी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एनसीबीने नुकतंच आर्यन खानची चौकशी केली. यावेळी त्याला कुटुंबाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. एनसीबी चौकशीवेळी आर्यन खानने कुटुंबाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. माझे वडील शाहरुख खान गेल्या काही काळापासून कामात फार व्यस्त असतात. त्यामुळे मला त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागते, असं आर्यनने सांगितलं आहे.

आर्यनने एनसीबी चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, सध्या माझे वडील त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटींग करत आहेत. त्यामुळे त्यांचे दैनंदिन वेळापत्रक फार व्यस्त झाले आहे. ते सध्या त्यांच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटासाठी फार मेहनत घेत आहेत. ‘पठाण’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी अनेक तास त्यांना मेकअप रुममध्ये राहावं लागतं, असंही तो म्हणाला आहे.

दरम्यान, आर्यन खानसोबतच मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांना देखील 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे. त्यानंतर 7 ऑक्टोबरला पुन्हा एकदा या सर्वांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

भावाच्या अटकेनंतर सुहाना खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मधुमेही रूग्णांंनी आहारात ‘या’ फळांचा समावेश करावा, साखर नियंत्रणात राहिल

वृद्ध दाम्पत्याचा चिलम फुंकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘या’ कंपनीचे शेअर्स घेतलेले गुंतवणूकदार सहा महिन्यांत झाले बक्कळ मालामाल!

पेट्रोल महाग झालं म्हणून तरूणाने केला ‘हा’ अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ